बीड: अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या 'सैराट'मधल्या आर्चीनं आता आंदोलकांनाही वेड लावल्याचं दिसून आलं आहे. निराधारांच्या मागण्यांसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसनं मोर्चा काढला होता. याच मोर्च्यात थेट सैराटमधली आर्चीही सहभागी झाली होती.


 

डोळ्यांना गॉगल लावून आर्चीच्या वेशात आलेल्या आंदोलक तरुणीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. सरकार दरबारी आपल्या मागण्या मांडण्यासाठी केलेल्या या आंदोलनालाही मग 'सैराट आंदोलन' असं नाव देण्यात आलं.

 

डोळ्याला गॉगल आणि 'इंग्रजीत सांगू का' या डायलॉगने मोर्चातील लोकांना अक्षरश: 'याड लावलं.' बीड शहरामधील दारिद्र्य रेषेचा सर्वे पूर्ण करावा, अल्प भूधारक व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं सर्व कर्ज माफ करावे. या मागण्यासाठी काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.