राजू शेट्टींच्या विश्रामगृहातून सदाभाऊंनी मुक्काम हलवला!
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 03 Mar 2017 03:32 PM (IST)
पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं पुन्हा एकदा दिसून येत आहे. सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी असलेल्या शासकीय विश्रामगृहातून मुक्काम हलवला. सदाभाऊ खोत यांनी काल (गुरुवार) उशिरा अचानक नोंदणी रद्द केली. पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी शासकीय विश्रामगृहात खोल्या बुक केल्या होत्या. मात्र राजू शेट्टी त्याच विश्रामगृहात उतरणार असल्याचं समजताच सदाभाऊंनी ऐनवेळी पाणीपुरवठा विभागाच्या विश्रामगृहात उतरण्याचा निर्णय घेतला. यानंतर सदाभाऊंचं रजिस्टरमधलं नाव खोडण्यात आलं. राजू शेट्टी यांना टाळण्यासाठी सदाभाऊ खोत यांनी विश्रामगृह बदलून घेतलं. विशेष म्हणजे राजू शेट्टी थांबलेल्या विश्रामगृहात विजय शिवतारे, दीपक केसरकर, दिलीप कांबळे हे मंत्रीही उतरले आहेत.