सांगली: सांगली निवडणुकीत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोतांचा निसटता पराभव झाला. या पराभवानंतर बोलताना सदाभाऊ खोतांनी राजू शेट्टींवर आगपाखड केली आहे.

राजू शेट्टी घराणेशाहीचं राजकारण करत आहेत. त्यांनी आयुष्यभर याच तत्त्वाचं राजकारण करत राहावं अशा शुभेच्छा. असं सदाभाऊ खोत म्हणाले.

राजू शेट्टी यांनी पहिल्या पासूनच सागर खोत यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. तसेच त्याचा प्रचार करण्यास देखील ते गेले नव्हते.

दरम्यान, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सांगितल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना सरकारमधून बाहेर पडावंच लागेल.’ असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला काही दिवसांपूर्वीच दिला होता. सदाभाऊंनी आपल्या मुलाला तिकीट देऊन त्यांनी पक्षात घराणेशाही आणली असा आरोपही राजू शेट्टींनी केला होता.

‘संघटना की सत्ता असा जेव्हा प्रश्न येईल त्यावेळी सदाभाऊंना यांना त्यापैकी एकाची निवड करावी लागेल. संघटना सांगेल तेव्हा सदाभाऊंना सत्ता सोडावी लागेल. सदाभाऊ हे चळवळीतून आले आहेत. त्यामुळे असा जेव्हा प्रसंग येईल त्यावेळी ते नक्कीच संघटनेला महत्व देखील अशी आशा आहे.’ असंही राजू शेट्टी म्हणाले होते.

VIDEO:



संबंधित बातम्या:

संघटना सांगेल तेव्हा सदाभाऊंना सत्ता सोडावी लागेल : राजू शेट्टी