Sachin Waze Case: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांना महिन्याला 100 कोटी वसुल करण्याचं टार्गेट दिलं होतं, अशी तक्रार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर (Param Bir Singh) यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन आरोपाची चौकशी करण्यासाठी न्या चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली. न्या चांदीवाल आयोगानं काल सचिन वाझे यांचा जबाब नोंदवलाय. यावेळी संजीव पालांडे यांच्या वकील शेखर जगताप यांनी सचिन वाझे यांची उलट तपासणी केली. दरम्यान, शेखर जगताप यांनी सचिन वाझे यांना कोणते प्रश्न विचारले? या प्रश्नांना सचिन वाझे यांनी नेमकं काय उत्तर दिलंय याबाबत जाणून घेऊयात. 


सचिन वाझे यांनी सुनावणीच्या वेळी न्या. चांदीवाल आयोगाला एक निवेदन दिलं. ज्यात त्यांनी परमबीर सिंग यांना आयोगासमोर साक्षीसाठी बोलवण्याची विनंती केली. तसेच अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून आपलं निलंबन रद्द करण्यासाठी अर्ज केला होता, असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, वकील शेखर जगताप यांनी सचिन वाझेंना नेमकं कोणते प्रश्न विचारले? यावर सचिन वाझेंनी काय उत्तर दिलंय? हे खालील संभाषणातून तुम्हाला कळणार आहे. 


शेखर जगताप आणि सचिन वाझे यांच्यातील संभाषण-


जगताप- अनिल देशमुखांनी तुम्हाला पुन्हा सेवेत रुजू होण्यास सांगितलं? याचा तुमच्याकडं कोणता पुरावा आहे? 


वाझे- माझ्याकडं विनंती पत्राव्यतिरिक्त काहीच नाही.


जगताप- तुम्ही सीआययूचे इंचार्ज असताना सप्टेंबर 2020 ते डिसेंबर 2020 दरम्यान तुम्हाला कोणकोणत्या प्रकरणांची चौकशी करण्यास सांगितली. तुम्ही याची माहिती परमबीर सिंह यांना दिली होती का? 


वाझे- मला कोणत्याही प्रकरणांची वैयक्तिकरित्या चौकशी करण्यास सांगितलं गेलं नाही. 


जगताप- नोव्हेंबर आणि डिसेंबर 2020 दरम्यान व्यापार आणि हॉटेलशी संबंधित विजिटर आले होते? 


वाझे- मला आठवत नाही. 


जगताप- सीआययूचे इंचार्ज असताना तुम्ही डिसेंबर 2020 मध्ये महेश शेट्टी किंवा दया पुजारीशी भेट घेतली होती का? 


वाझे- माझ्या लक्षात नाही.


जगताप- सीआययूनं नोव्हेंबर आणि डिसेंबर 2020 दरम्यान मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटवर छापेमारी किंवा चौकशीची कारवाई झाली होती? 


वाझे- अशी कारवाई रेकॉर्डवर येईपर्यंत त्यावर भाष्य करता येणार नाही.


जगताप- सीआययूचं इंचार्ज असताना तुमच्याकडं असं काही अधिकारी होते, ज्याच्या जोरावर तुम्ही बार आणि रेस्टॉरंटवर सीजर करू शकतात.


वाझे- मला तुमचा प्रश्न समजला नाही. 


जगताप-  सीआययूचा इंजार्ज असताना तुमच्याकडे काही विशेष अधिकार होते, ज्यामुळं तुम्हाला बार आणि रेस्टॉरंटमध्ये सीझर करण्याची परवानगी होती?


वाझे- ये खरं नाही.


जगताप- हे खरंय का? तुम्हाला जानेवारी ते फेब्रुवारी 2021 मध्ये काही गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यात सांगितली होती. 


वाझे- व्यक्तिगत बोलायचे झाले तर, फेब्रुवारी महिन्यात केवळ एक प्रकरण देण्यात आलं होतं. 


जगताप- ...आणि ऑगस्ट 2020 ते फेब्रुवारी मध्ये? 


वाझे- एक प्रकरण वगळता इतर प्रकरणे नव्हती आणि युनिट इंचार्ज असल्यानं मी प्रकरणांवर देखरेख करत होतो.


जगताप- परमबीर सिंह यांनी तुम्हाला कोणत्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी आदेश दिले होते का?


वाझे- नाही, मला इमिडिएअ बॉस आणि सुपरवाइजरकडून इंट्रक्शन मिळायचे? 


जगताप- संजीव पालांडे यांना तुम्ही वैयक्तिकरित्या ओळखता का?


वाझे- हा, मी त्यांना गृहमंत्रीचे पर्सनल सेक्रेटरी म्हणून ओळखायचो. माझी आणि त्यांची पर्सनली ओळख नव्हती.


जगताप- त्यावेळी काय तुम्ही गृहमंत्री कार्यालयात गेले होते का? 


वाझे- मला आठवत नाही. 


जगताप- तुमचे आणि पालांडेंच कधी बोलणं झालं का? 


वाझे- नाही, मी त्याच्याशी सीआय़यूद्वारे तपासल्या जाणार्‍या कार्यालयीन कामाशी संबंधित विषयांवर बोलायचो.


जगताप- तुमची कधी पालांडेसह बार आणि रेस्टॉरंटसे संबंधित काही चर्चा झाली होती? पालांडेनं कधी तुमच्याशी पैशांसंबिधत चर्चा झाली. 


वाझे- नाही


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-