मुंबई : सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)  यांनी ऑनलाइन रमीची जाहिरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार सोडावा, नाही तर सहा किंवा सात तारखेला तेंडुलकर यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा जाळणार, असा इशाराप्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री   बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) दिला आहे.  ऑनलाईन रमीच्या व्यसनातून तेंडुलकरांच्या अंगरक्षकानं आत्महत्या केल्याचा आरोप  बच्चू  कडूंनी  आरोप  केला आहे. 


बच्चू  कडू म्हणाले, ही अतिशय खेदजनक आणि संताप आणणारी गोष्ट आहे.  सचिन तेंडुलकराचा जो अंगरक्षक आहे तो सचिनचे संरक्षण करण्याचे काम करतो. त्याच्यावर कोणी हल्ला करु नये त्याला कोणतीही इजा होऊ नये. मात्र जर सचिनच्याच जाहिरातीमुळे अंगरक्षकाला आत्महत्या करावी लागत असेल तर ही जबाबदारी सचिन तेंडुलकरने स्विकारली पाहिजे.  ज्या व्यक्तीचा  भारतरत्न म्हणून गौरव करण्यात आला किंवा भारतरत्न म्हणून आपण स्विकारले त्यांच्याच जाहिरातीमुळे अंगरक्षक आत्महत्या करत असेल तर याचा निषेध आम्ही करणार आहोत. सचिन तेंडुलकरने गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे किंवा भारतरत्न पुरस्कार तो सोडावा. जर सचिनने जाहिरात नाही सोडली तर शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पुतळा जाळणार आहोत आणि पुन्हा आंदोलन करणार आहोत.  


आत्महत्येचे कारण अद्याप समोर नाही


सचिन  तेंडुलकरच्या  (Sachin Tendulkar)  घरी सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रकाश कापडे यांनी 15 मे रोजी जळगावच्या राहत्या घरी आत्महत्या केली.   गेली पंधरा वर्षा पासून ते एस आर पी एफ मध्ये कार्यरत होते. मात्र   आत्महत्येचे कारण कळू शकले नाही,त्याचा पोलिस तपास करत आहेत. प्रकाश कापडे हे मुंबईत सचिन तेंडुलकरच्या घरी सुरक्षा रक्षकाचे काम करत होते.  गेली पंधरा वर्षा पासून ते एस आर पी एफ मध्ये कार्यरत होते. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही,त्याचा पोलिस तपास करत आहेत. राहत्या घरी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


सचिन तेंडुलकरकडून ऑनलाइन रमीची खुलेआम जाहिरात


भारतरत्न सचिन तेंडुलकर ज्याला क्रिकेटचा देव म्हणून देशात मान आहे. अनेक जण सचिन तेंडुलकरला आपला रोल मॉडेल  मानतात.  सचिन तेंडुलकरकडून ऑनलाइन रमीची जाहिरात खुलेआम केली जात आहे. सचिन तेंडुलकरच नाही तर भाराततील  अनेक सेलिब्रिटी या ऑनलाइन रमीची जाहिरात करत आहेत. याच्यावर बंदी आणली पाहिजे, अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. सेलिब्रिटी, खेळाडूंचे अनेक फॉलोअर्स आज सोशल मीडियावर आहे.  त्यांचे अनुकरण त्यांचे चाहते करतात.अशा जाहिराती पाहून  त्यांना बळी पडण्याची शक्यता आहे.