उस्मानाबाद : खासदार आदर्श गाव योजनेअंतर्गत भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंध्र प्रदेशमधील पुत्तमराजूकन्ड्रिगा गावाचा कायापालट केला. त्यानंतर सचिनने महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंजा गाव दत्तक घेतलं आहे.


 
ही बातमी डोंजा गावात पोहोचताच एकच जल्लोष झाला. हलगीच्या तालावर गुलालाची उधळण करत गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

 

 



 

याआधी सचिनने निवडलेलं आंध्र प्रदेशच्या पुत्तमराजूकन्ड्रिगा गावाची खासदार आदर्श ग्राम योजनेसाठी निवड केली होती. नेल्लोर जिल्ह्यातील हे गाव दुर्लक्षित होतं. मात्र आता या गावाचा कायापालट झाला.

 

 
त्या पार्श्वभीमीवर डोंजा गावाची निवड झाल्याने गावात विकासाची गंगा वाहिल, असा गावकऱ्यांना विश्वास आहे. जिल्हा प्रशासनानेही संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात तातडीने पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.