पोलिसाला मारहाण, भंडाऱ्याचे आमदार रामचंद्र अवसरेंवर गुन्हा
एबीपी माझा वेब टीम | 18 Aug 2016 03:33 AM (IST)
भंडारा : पोलिस शिपायांना मारहाण केल्याप्रकरणी भंडाऱ्याचे भाजप आमदार रामचंद्र अवसरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवसरेंना आज अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुधवारी रात्री उशीरा तुमसर पोलिस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला. भंडाऱ्यात काल तिरंगा रॅलीदरम्यान अवसरे यांच्या चालकाला पोलिसांनी धक्काबुक्की केली. याचा राग मनात ठेऊन अवसरे यांनी शिपायाला मारहाण केली. ही मारहाण एका मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे आज अवसरे यांच्याविरोधात काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.