Sachin Waze On Jayant Patil : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघेल अशी खळबळजनक बातमी समोर येत आहे. मुंबईचे निलंबीत पोलीस अधिकारी आणि 100 कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी पुन्हा एकदा खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. वसुली प्रकरणात सचिन वाझेंने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांचे नाव घेतले आहे.
वसुली प्रकरणात तुरुंगात असलेल्या सचिन वाझेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहे. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप केला.तसेच या प्रकरणातील पुरावे देखील त्यांनी फडणवीसांना दिले आहे. फडणवीसांना लिहलेल्या पत्रात वाझेंनी जयंत पाटलांचे देखील नाव असल्याचा दावा केला आहे. वसुली प्रकरणात जयंत पाटील यांचे नाव समोर आल्याने राज्याच्या राजकरणात मोठी खळबळ उडाली आहे.
जयंत पाटलांवर नेमके आरोप काय?
सचिन वाझेंनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात नेमके काय लिहिले या संदर्भातील सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या पत्रात सचिन वाझेंनी प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आगे. या पत्रातच अनिल देशमुखांबरोबरच जयंत पाटलांवर देखील आरोप केले आहेत. पत्रातील माहिती समोर आल्यानंतर जयंत पाटलांवर नेमके काय आरोप केले यासंदर्भातील माहिती समोर येईल.
सचिन वाझेंचे गौप्यस्फोट
- फडणवीसांना दिलेल्या पत्रात मी जयंत पाटलांचेही नाव लिहलंय
- अनिल देशमुखांना पी ए मार्फत पैसे दिले जायचे
- मी जे बोलतोय, त्याचे सारे पुरावे आहेत,सीबीआयकडेही पुरावे आहेत
- फडणवीसांना लिहलेल्या पत्रात मी सारे पुरावे दिलेयत
- माझी नार्को करा, मी नार्को टेस्टसाठी तयार आहे