मुंबई : हिंदू राष्ट्रवाद हा भगवा दहशतवाद कधीच नव्हता मात्र केवळ मुसलमानांची सहानुभूती मिळवण्यासाठी काँग्रेसनं या राष्ट्रवादाला दहशतवादाचा रंग दिल्याचा आरोप, शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'मध्ये करण्यात आला आहे.   मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकऱणी एनआयएनं साध्वी प्रज्ञा सिंग यांना क्लीन चिट दिली आहे. याबाबत शिवसेने 'सामना'तून आपली भूमिका मांडली.   या प्रकरणातून हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या संघटनांनी तपास अधिकाऱ्यांवर बदनामीचा खटला चालवावा असा सल्ला देण्यात आला आहे.   शहीद हेमंत करकरे यांचं हौतात्म्य मोठं आहे. मात्र त्यांनी या प्रकरणात केलेला तपास सदोष होता. राजकीय मालकांना सुखावणारा होता अशी टीका या अग्रलेखात करण्यात आली आहे.
"हेमंत करकरे यांनी ‘२६/११’च्या हल्ल्यात हौतात्म्य पत्करले. त्यांच्या हौतात्म्यास आमचा सलाम, पण मालेगाव बॉम्बस्फोटाचा दहशतवादविरोधी पथकाने केलेला तपास वादग्रस्तच ठरला. राजकीय मालकांना खूश करण्यासाठीच या तपासाची आखणी झाली. दिल्लीत चिदंबरम, महाराष्ट्रात शरद पवार, आर. आर. पाटील यांच्यासारख्या लोकांनी ‘मुसलमानांना टार्गेट केले जात आहे’ असे छाती पिटून सांगितले व दहशतवादाला भगवा रंग देऊन ते मोकळे झाले", असं 'सामना'त म्हटलं आहे.
'सामना' अग्रलेखाचा काही भाग जसाच्या तसा
‘हिंदू राष्ट्र’वाद म्हणजे भगवा दहशतवाद नाही!
बदनामी करणे हा गुन्हाच असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोटात नाहक अडकवून ज्यांचा छळ केला अशा सर्व लोकांनी तपास अधिकार्‍यांवर बदनामीचा गुन्हा दाखल करायला हवा. मालेगाव बॉम्बस्फोट हा हिंदू दहशतवादाचा प्रकार असल्याची डरकाळी तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताधार्‍यांनी फोडली. हिंदू कट्टरवादी मंडळींनी हा बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा बोगस तपास तेव्हाच्या ‘एटीएस’ने म्हणजे दहशतवादविरोधी पथकाने केला.
साध्वी प्रज्ञा सिंह, ले. कर्नल पुरोहित यांच्यासह सात-आठ लोकांना या प्रकरणात नाहक गोवले. त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला. यानिमित्ताने हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्याची भरपाई कधीच होणार नाही. साध्वी प्रज्ञा सिंह व कर्नल पुरोहित यांना मालेगाव स्फोटात गोवले. हे सर्व लोक हिंदुत्ववादी किंवा ‘हिंदू राष्ट्र’ संकल्पना मानणारे असू शकतात, पण हा काही देशद्रोहासारखा गुन्हा ठरू शकत नाही. बरेच लोक हिंदुस्थानचे दुसरे पाकिस्तान करण्याचे मनसुबे पूर्ण करू इच्छित आहेत व राजकीय स्वार्थासाठी अशा लोकांना पाठबळ मिळत आहे, हाच देशद्रोह आहे! त्यामुळे हिंदू राष्ट्र संकल्पना म्हणजे भगवा दहशतवाद नाही. राजकीय कट व राजकीय दबावाचाच हा एक भाग होता. धर्मांध मुसलमानांनी पाकिस्तानच्या मदतीने हिंदुस्थानात सुरू केलेला दहशतवाद मोडून काढायचे सोडून मुसलमानांना खूश करण्यासाठी