मुंबई: 'नीट' परिक्षेच्या घोळावर विद्यार्थी आणि पालकांची बाजू मांडण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' बंगल्यावर भेट घेतली.

 

'नीट' परीक्षा कधीपासून लागू करायची यासंदर्भातला निर्णय पालक आणि मुख्यमंत्र्यांनी  घ्यावा, असं राज ठाकरे म्हणाले.  देश नेमकं कोर्ट चालवतंय की सरकार असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.

 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना आज संध्याकाळपर्यंत पंतप्रधानांसोबत बैठकीची वेळ मिळणार असल्याची माहिती राज यांनी या भेटीनंतर दिली.

 

राज ठाकरे यांनी नीटच्या मुद्द्यासोबतच राज्यातल्या भीषण दुष्काळाबाबतही मुख्यमंत्र्यांशी बातचित केली.

 

दरम्यान मुख्यमंत्री आज 12 वाजता नीटच्या विषयावर पत्रकार परिषद घेणार आहेत.

 

संबंधित बातम्या :


'नीट' प्रश्नी सुप्रीम कोर्टाचा विद्यार्थ्यांना दिलासा नाही



सविस्तर वृत्त : ‘नीट’ परीक्षेचा नेमका घोळ काय आहे?



तावडेंनी माझ्या मुलाची फसवणूक केली, पालक पोलिसात



‘नीट’विरोधात सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार



त्यापेक्षा अभ्यास करा, ‘नीट’बाबत विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली



‘नीट’ची परीक्षा 1 मे रोजीच होणार, सुप्रीम कोर्टाचे आदेश