कोल्हापूर/मुंबई : 31 डिसेंबर निमित्त कोल्हापुरात मटण मार्केटमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. नागरिकांनी तासनतास रांगेत थांबून मटण आणि चिकनची खरेदी केली. तर मुंबईत मासे घेण्यासाठी खवय्यांनी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं.


मुंबईकर दरवर्षी 31 डिसेंबर निमित्त मासे आणि चिकन घेण्यासाठी मार्केटमध्ये गर्दी करतात. मात्र यावेळी बऱ्याच जणांनी बाहेरगावी जाऊन किंवा रेस्टॉरंटमध्ये जल्लोष करण्याचा बेत आखलेला दिसतोय. त्यामुळे मच्छिमार्केटमध्ये म्हणावी तशी गर्दी पाहायला मिळाली नाही.

शनिवारी बेंचमार्क नाशिक विभागातून 84 रुपये प्रतिकिलो या दराने ब्रॉयलर्स पक्ष्यांची विक्री झाली. ब्रॉयलर पोल्ट्रीसाठी गेल्या काही वर्षांत प्रथमच 31 डिसेंबर नफ्याचा ठरला. आनंद अॅग्रो समुहाचे उप महाव्यवस्थापक डॉ. मोहन गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंबईसाठी जवळपास 1600 टन तर उर्वरित राज्यासाठी 900 हजार टन अशी 2500 टन मालाची विक्री झाली. "

मुंबईतील जोरदार मागणीमुळे शनिवारी दुपारपर्यंतच बुकिंग पूर्ण झालं होतं. काही ठिकाणी तर मनुष्यबळाअभावी बुकिंग रद्द करावं लागलं, इतका मागणीचा जोर होता, असंही मोहन गिरी म्हणाले.