मुंबई: नोटाबंदीचा निर्णय राज्यातील 4 जणांच्या जीवावर उठला आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरात बँकेसमोर रांगेत उभ्या असलेल्या एका ग्राहकाचा मृत्यू झाला. सिकंदर पठाण हे 50 वर्षीय व्यक्ती रांगेत उभे होते, त्यावेळी त्यांना चक्कर आली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.


नोटाबंदीचा निर्णय होऊन आठ दिवस उलटले तरी अद्यापही एटीएम आणि बँकांच्या बाहेर मोठ्या प्रमाणात रांगा आहेत. याचा ताण बँक कर्मचाऱ्यांवरही येतोय.

पुण्यातील राजगुरुनगरच्या एसबीआय बँकेमध्ये तुकाराम तनपुरे कार्यरत होते. बँकेत कामावर असताना त्यांना अचानक ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

इकडे भाईंदरमध्ये साठ वर्षीय दीपकभाई शाह नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे होते. त्यावेळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झालाय.

तर तिकडे नांदेडच्या बळीरामपूरमध्ये एका 70 वर्षीय वृध्दालाही आपला जीव गमवावा लागलाय.