औरंगाबाद: औरंगाबादच्या पैठण गेट परिसरातून 17 लाखाहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एका गाडीतून ही रोकड ताब्यात घेण्यात आल्या असून यामध्ये सर्व 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा आहेत.


काल रात्री उशीरा औरंगाबादच्या पैठण गेट परिसरातून 17 लाख 90 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही रोकड एका गाडीतून जप्त करण्यात आली असून, चाणाक्यनगरी पतसंस्थेची ही रक्कम असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यापासून अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या छापेमारीत कोट्यवधींची रोकड हस्तगत करण्यात प्रशासनाला यश येत आहे. कालच उमरग्यामधील आयुर्वेदीक कॉलेजजवळून लाखोंची रोकड जप्त करण्यात आली. तसेच राज्याच्या अनेक भागातूनही करण्यात आलेल्या छापेमारीत कोट्यवधी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.