पाथर्डीतल्या दसरा मेळावा कृती समितीच्या बैठकीनंतर सर्वजण महंत नामदेव शास्त्री महाराजांच्या भेटीला गेले. त्यापूर्वीच गडावर परिसरातील नागरिक मोठ्याप्रमाणात जमा झाले होते. गडावरील गेट बंद करुन कृती समितीच्या नागरिकांना रोखून धरुन घोषणांचा जयघोष सुरु झाला. त्यावरुन दोन्ही गटात चांगलीच बाचाबाची झाली.
या जोरदार बाचाबाचीनंतरही कृति समितीला नामदेव शास्त्रींना निवेदन देता आलं नाही. त्यामुळे दसरा मेळावा पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडतो की, शास्त्री महाराज आपल्या निर्णयावर ठाम राहतात, याकडे सर्वांचं लक्क्ष लागलं आहे. परिस्थिती संवेदनशील असतानाही गडावर पोलिस मात्र नगण्यच पाहायला मिळाले.
दसरा मेळाव्या संदर्भात सात ठराव मंजूर
दसरा मेळावा कृती समितीच्या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा करण्याचा निश्चय करण्यात आला. यामध्ये सात ठराव मंजूर करण्यात आले आहेत. दसरा मेळाव्यासाठी ओबीसी संघटनेनेही पाठिंबा दर्शवला आहे.
- पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यास भगवान गडावर यावं, यासाठी त्यांना नियंत्रण देण्यात येत असून त्यांनी निमंत्रण स्वीकारावं
- मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण देण्यात येणार
- दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणे पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांना मार्गदर्शन करावं
- गोपीनाथ मुंडे ज्या स्टेजवरुन दसऱ्याच्या शुभेच्छा देत होते, त्याच ठिकाणावरुन पंकजा मुंडे यांनी शुभेच्छा द्याव्या
- नामदेव शास्त्री महाराज यांनी समाजाच्या भावना लक्षात घेऊन दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवावी
- भगवानगडावर राजकीय भाषण करणार नसून शांततेत मेळावा होईल
- दसरा मेळावा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने मदत करावी
पाहा व्हिडिओः