औरंगाबाद : 'दशक्रिया' सिनेमाच्या प्रदर्शनावरुन पुरोहित आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आमने-सामने आले. पुरोहितांनी बंद पाडलेल्या 'दशक्रिया' सिनेमाच्या शोला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला.
पुरोहितांनी आज सकाळी प्रोझोन मॉलमधील सिनेमागृहात घुसून निदर्शनं केली आणि सिनेमाचा शो बंद पाडला. चित्रपटात ब्राह्मण समाजाची बदनामी आरोप करत सिनेमा प्रदर्शित करु नये अशी मागणी त्यांनी केली.
'दशक्रिया'विरोधातील पुरोहितांची याचिका फेटाळली
परंतु संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी 'दशक्रिया' चित्रपटाला संरक्षण देत काही काळाने चित्रपट पुन्हा सुरु केला. परंतु या दरम्यान पुरोहित आणि संभाजी बिग्रेडचे कार्यकर्ते यांच्यात वाकयुद्ध रंगलं होतं.
दुसरीकडे पुरोहितांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्याने दशक्रिया चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला.
BLOG : दशक्रिया सिनेमाला विरोध का?
दरम्यान, पैठणमध्ये सकाळी काहीकाळ दशक्रिया विधी बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता याचिका फेटाळल्याने पुरोहितांनी पुन्हा एकदा विधी करण्यास सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या
‘दशक्रिया’ दाखवणार नाही, पुण्यातील ‘सिटी प्राईड’चा निर्णय
‘दशक्रिया’ प्रदर्शित व्हावा, त्यावर चर्चा व्हाव्यात : अविनाश पाटील
‘दशक्रिया’ चित्रपटाला अखिल भारतीय ब्राम्हण संघाचा विरोध