खंडपीठाने हा निर्णय देताना, सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांच्यावरील लघुपटाचा संदर्भ दिला.
पैठण येथील पुरोहित संघाने दशक्रिया चित्रपटातीलअनेक संवाद, उल्लेख हे मानहानिकारक, भावना दुखावणारे , संदर्भहीन असल्याने ते वगळावेत, तसंच चित्रपटावर बंदी घालावी अशी याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केली होती.
अनेक ठिकाणी विरोध
दरम्यान राज्यातील अनेक ठिकाणी दशक्रिया चित्रपटाला विरोध सुरु आहे. पैठणनंतर आता नाशिक आणि बुलडाण्यातही आंदोलन करण्यात आलं.
त्र्यंबकेश्वर आणि नाशिक पुरोहित संघानं चित्रपट मालकांपासून ते मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. तर बुलडाण्यात चित्रपटाचं पोस्टर फाडून निषेध करण्यात आला.
पैठणमध्ये सकाळी काहीकाळ दशक्रिया विधी बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा पुरोहितांनी विधी कऱण्यास सुरुवात केलीय.
तर तिकडे पुण्यात ब्राह्मण महासंघाच्या विरोधानंतरही बहुतेक सर्वच चित्रपटगृहांनी दशक्रिया हा चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यातल्या सिटी प्राईट मल्टीप्लेक्स, सिंहगड रोडच्या फन टाईम आणि प्रभात थिएटर वगळता इतर सर्व चित्रपटगृहात दशक्रिया हा चित्रपट दाखवला जाणार आहे.
दशक्रिया सिनेमाला विरोध
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने दशक्रिया सिनेमाला विरोध दर्शवला आहे. चित्रपटात ब्राह्मण समाजाची बदनामी केल्याचा महासंघाचा आरोप आहे.
या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून 64 वा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. शुक्रवारी 17 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. मात्र, सिनेमाला विरोध करणारं निवेदन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेकडे देण्यात आलं आहे.
सिनेमा प्रदर्शित झाल्यास त्याविरोधात महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा ब्राह्मण महासंघाकडून देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
‘दशक्रिया’ प्रदर्शित व्हावा, त्यावर चर्चा व्हाव्यात : अविनाश पाटील
‘दशक्रिया’ दाखवणार नाही, पुण्यातील ‘सिटी प्राईड’चा निर्णय
BLOG: दशक्रिया सिनेमाला विरोध का?