अकोला: संघाचे प्रचार प्रमुख आणि प्रवक्ते मनमोहन वैद्य यांनी नाव न घेता मराठा मोर्चांवर निशाणा साधला आहे. काही लोकांकडून जातीय राजकारणातून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं ते म्हणाले.

अकोल्यामध्ये रा.स्व.संघाचा विजयादशमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कधीकाळी देणारेच, आज तेच मागत असंही ते यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना त्यांनी पश्चिम बंगालमधील हिंदूवर होणाऱ्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली. ''बंगालमध्ये हिंदूवर अत्याचार वाढले आहेत, मतपेटीच्या राजकारणातून बंगाल सरकार हे सगळं करत आहे, ''

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना लक्ष्य करताना, काही शक्तींकडून हिंदू शब्दावरुन देशात भय निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे ते यावेळी म्हणाले.