औरंगाबाद: अघोषित संपत्तीची घोषणा अर्थात इन्कम डिक्लेरेशन स्कीम योजनेअंतर्गत मराठवाड्यात तबब्ल 500 कोटीची अघोषित संपत्ती घोषित झाली आहे.

प्रधानमंत्री गरिब कल्याण योजने अंतर्गतही आयकर विभागाला 49 कोटी रुपये मिळाले. शिवाय मराठवाड्यात तब्बल एक लाख 25 हजार करदात्याची संख्या वाढली आहे. त्यामुळेच मराठवाड्यात 500 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती उघड झाली आहे.

केंद्र सरकारने कर चुकवेगीरी करणाऱ्यांसाठी इन्कम डिक्लेरेशन स्कीम योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत  माराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 500 कोटीची रक्कम जमा झाली आहे. मराठवाड्यात गेल्या तीन वर्षात मोठा दुष्काळ होता, तरीदेखील एवढी रक्कम जमा झाली हे विषेश आहे.

इन्कम डिक्लेरेशन स्कीम अंतर्गत आयकर विभागान 148 ठिकाणी पाहणी केली. त्यात दोषी असणाऱ्या लोकांना या योजनेची माहिती दिली, त्यामुळे 145 कोटी रुपयांची अघोषित रक्कम जमा झाली. म्हणजे मराठवाड्यातून 645 कोटीची संपत्ती घोषित झाली. ही रक्कम नाशिक विभागापेक्षा अधिक आहे.

याशिवाय कर भरणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. 2016 साली मराठवाड्यात करदात्यांची संख्या 2 लाख 30 हजार होती. यावर्षी यामध्ये  तब्बल 1 लाख 25 हजारांची वाढ झाली आहे.

आता मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात मिळून 3 लाख 55 हजार करदाते आहेत. यामुळे 992 कोटीची उलाढाल असलेल्या मराठवाडा आयकर विभागाला 1470 कोटी रुपये मिळाले आहेत.