मुंबई : राज्यात एकीकडे शेतकरी कर्जमाफीची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याच्या कामाला वेग आला असताना, अर्ज न भरताही चक्क आमदाराच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे.

शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या खात्यात कर्जमाफीचे 25 हजार रुपये जमा झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कर्जमाफीसाठी अर्जही भरला नव्हता. तरीदेखील पैसे जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आमदार प्रकाश आबिटकर यांनी कर्जमाफीचे 25 हजार रुपये आपल्या खात्यात जमा झाल्याचं सभागृहात निदर्शनास आणून दिलं. प्रकाश आबिटकर हे कोल्हापुरातील राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

जर माझ्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली असेल तर राज्यातील कर्जमाफीमध्ये घोटाळा झाला असेल, अशी शक्यता आबिटकर यांनी वर्तवली. ही चूक दुरुस्त करुन गरजूंना मदत मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली.

याबाबत एबीपी माझाशी बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले की, "आज सकाळी मला सोसायटीच्या चेअरमनचा फोन आला आणि कर्जमाफीची 25 हजार रुपयांची रक्कम जमा झाल्याचं ते म्हणाले. परंतु अर्ज दाखल न करताही पैसे कसे काय जमा झाले याची विचारणा केली. कोल्हापुरात काल 79 हजार लोकांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा झाले. त्यामध्ये शिक्षक, निवृत्ती शिक्षकांसह माझाही समावेश आहे."

"आमदार, खासदारांचे कुटुंबीय कोणीही कर्जमाफीसाठी लाभार्थी नसताना माझ्या खात्यात पैसे जमा झाले. कर्जमाफीची मदत मूळ गरजूंना मिळावी, ऑनलाईन प्रक्रियेतून शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये. जर माझ्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली असेल तर राज्यातील कर्जमाफीमध्ये घोटाळा झाला असेल. ही चूक दुरुस्त करुन गरजूंना मदत मिळावी."

संबंधित बातम्या

पात्र असून कर्जमाफीसाठी अर्ज न करता आलेल्या शेतकऱ्यांनाही संधी : मुख्यमंत्री

कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याला वेग

कर्जमाफीचा ऑनलाईन घोळ IT विभागाच्या प्रधान सचिवांना भोवला

कर्जमाफी घोळ : आयटी विभागाच्या प्रधान सचिवांची उचलबांगडी होणार

शेतकऱ्यांच्या खात्यातील कर्जमाफीचे पैसे पुन्हा सरकारकडे वळते

'कर्जमाफी' अधिकाऱ्यांच्या जीवावर, एकाचा मृत्यू, तर दुसरा आयसीयूत

शेतकरी कर्जमाफी योजना सन्मानित नाही तर अपमानित योजना : अजित पवार

'आघाडी सरकारनं कर्जमाफीत घोळ केला असेल तर कारवाई करा'

कर्जमाफीचे पैसे वाटण्यास अखेर सुरुवात!