मनमाड : मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड जवळच्या मंगरुळ टोल नाक्यावर काल (गुरुवार) रात्री पोलिसांनी मुंबईकडे जाणाऱ्या बोलेरो गाडीत मोठा शस्त्रसाठा पकडला आहे.
यावेळी 25 रायफल, 17 रिव्हालवर, 2 विदेशी पिस्तूल आणि तब्बल 4146 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी तीन जणांना ताब्यातही घेण्यात आलं आहे.
नेमकी घटना काय?
काल रात्री मालेगावजवळ वाके शिवारात गाडीत डिझेल भरल्यानंतर डिझेलचे पैसे न देता बंदुकीचा धाक दाखवत हे तिघेही जण निघून गेले होते. यानंतर पेट्रोल पंप चालकाने ही माहिती स्थानिक पोलिसांना दिली.
परिस्थितीचं गांभीर्य ओळखत पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करत चांदवड टोलनाक्याजवळ ही गाडी अडवून तिची झडती घेण्यात आली. तेव्हा या गाडीतून प्रचंड शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
हा शस्त्रसाठा लपविण्यासाठी या गाडीमध्ये विशिष्ट पद्धतीचे खाचे करण्यात आले होते. ज्यामध्ये एवढ्या प्रमाणात शस्त्रं लपविण्यात आली होती. याप्रकरणी तीन जणांन ताब्यात घेतलं असून त्यांची सध्या कसून चौकशी सुरु आहे.
अवैध शस्त्रसाठ्याचं उत्तरप्रदेश कनेक्शन?
दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशमधील एका गोडाऊनमधून हा शस्त्रसाठा आणण्यात येत होता. पण हा शस्त्रसाठा नेमका कुठे नेला जाणार होता आणि त्यांचा नेमका उद्देश काय होता याबाबत कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. मात्र, एवढा मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा सापडल्यानं मोठी खळबळ माजली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर 25 रायफलसह मोठा शस्त्रसाठा जप्त
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Dec 2017 08:57 AM (IST)
मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड जवळच्या मंगरुळ टोल नाक्यावर काल (गुरुवार) रात्री पोलिसांनी मुंबईकडे जाणाऱ्या बोलेरो गाडीत मोठा शस्त्रसाठा पकडला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -