जुन्या नोटा स्वीकारुन राज्यात तब्बल 1400 कोटींचा कर वसुली
एबीपी माझा वेब टीम | 25 Nov 2016 10:09 PM (IST)

मुंबई: जुन्या एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर या नोटा काही ठराविक ठिकाणीच स्वीकारण्यात येत होत्या. राज्यातील अनेक महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये करापोटी जुन्या नोट्या स्वीकारण्यात येत होत्या. याचाच चांगला परिणाम महापालिका आणि नगरपालिकांना पाहायला मिळाला. विविध कर व थकबाकीपोटी तब्बल 1400 कोटी 77 लाख रुपयांची कर वसुली झाली आहे. सर्वाधिक कर वसुली 489 कोटी 61 लाख रुपये मुंबई पालिकेत करण्यात आली आहे. त्यानंतर पुणे महानगरपालिकेत 144 कोटी 52 लाख रुपयांची वसुली झाली आहे. अशी माहिती नगरविकास विभागाने दिली आहे. 8 नोव्हेंबर 2016च्या मध्यरात्रीपासून एक हजार व पाचशेच्या नोटा व्यवहारातून रद्द करण्यात आल्या. पाहा कोणत्या महानगरपालिकेत किती कोटी कर वसूल:मुंबई महानगरपालिका: 489 कोटी 61 लाखनवी मुंबई महानगरपालिका: 57 कोटी 66 लाखकल्याण-डोबिंवली महानगरपालिका: 62 कोटी 67 लाखमीरा-भाईंदर महानगरपालिका: 70 कोटी 77 लाखवसई-विरार महानगरपालिका: 22 कोटी 96 लाखउल्हासनगर महानगरपालिका: 37 कोटी 18 लाखपनवेल महानगरपालिका: 7 कोटी 53 लाखभिवंडी-निजामपूर महानगरपालिका: 21 कोटी 55 लाखपुणे महानगरपालिका: 144 कोटी 52 लाखपिंपरी-चिंचवड महानगरपालिका: 42 कोटी 14 लाखठाणे महानगरपालिका: 51 कोटी 75 लाखसांगली-कुपवाड महानगरपालिका: 18 कोटी 30 लाखकोल्हापूर महानगरपालिका: 13 कोटी 94 लाखअहमदनगर महानगरपालिका: 9 कोटी 93 लाखनाशिक महानगरपालिका: 23 कोटी 50 लाखधुळे महानगरपालिका: 14 कोटी 95 लाखजळगाव महानगरपालिका: 13 कोटी 63 लाखमालेगाव महानगरपालिका: 8 कोटी 1 लाखसोलापूर महानगरपालिका: 27 कोटी 10 लाखऔरंगाबाद महानगरपालिका: 16 कोटी 18 लाखनांदेड-वाघाळा महानगरपालिका: 17 कोटी 75 लाखअकोला महानगरपालिका: 5 कोटी 25 लाखअमरावती महानगरपालिका: 16 कोटी 20 लाखनागपूर महानगरपालिका: 32 कोटी 45 लाखपरभणी महानगरपालिका: 94 लाखलातूर महानगरपालिका: 6 कोटी 77 लाखचंद्रपूर महानगरपालिका: 6 कोटी 81 लाखराज्यातील सर्व नगरपालिकामधून 160 कोटी 72 लाख कर वसुली झाली आहे.एकूण जमा रक्कम 1400 कोटी 77 लाख रुपये.