मुंबई: नोटाबंदीच्या निर्णयाचा परिणाम आता हळूहळू प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतो आहे. प्रत्येक क्षेत्रात या निर्णयाचा प्रभाव पडला आहे. अर्थशास्त्रज्ञांच्या मते, सरकारच्या या निर्णयाचे भविष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.


दरम्यान, या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम रिअल इस्टेट व्यवसायावर झाल्याचं दिसून येत आहे. मीडिया वृत्तानुसार, घरांच्या किंमती तब्बल 30 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात. असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

दुसरीकडे सरकार नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर मागील 15 दिवसात रिअल इस्टेट व्यवसायात अचानक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली आहे. आपला काळा पैसा लपवण्यासाठी अशी गुंतवणूक सुरु असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

दरम्यान, भारतात रिअल इस्टेट व्यवसायातील एकूण मूल्य 39,55,044 कोटी होतं. मात्र या निर्णयानंतर त्याच्यात घट आली असून आता याचं एकूण मूल्य 31,52,170 कोटी रुपये आहे.