सातारा: साताऱ्यातील माण तालुक्याचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एका महिलेला अश्लील मेसेज पाठवून शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप आमदार गोरेंवर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गरीब गरजू मुलांना व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षण देणाऱ्या एका संस्थेतील महिलेनं पोलिसात ही तक्रार केली आहे.
व्हॉट्सअपवर अश्लील मेसेज करुन शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप पीडित महिलेने आमदार गोरेंवर केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आमदार गोरेंना फोनवरुन संपर्क करण्याचा एबीपी माझानं प्रयत्न केला. मात्र, आमदार गोरे फोनवर उपलब्ध होऊ शकले नाही. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून याप्रकरणी चौकशी सुरु केली आहे.