IPL 2021 RR vs PBKS Live Score : राजस्थान विरुद्ध पंजाब, कोण मारणार बाजी? पाहा लाईव्ह अपडेट्स

RR vs PBKS Score, IPL 2021 LIVE Cricket Score

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Apr 2021 07:19 PM
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनचं अर्धशतक

IPL 2021 RR vs PBKS Live Score : राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनचं अर्धशतक, राजस्थानला विजयासाठी 56 चेंडूत 114 धावांची गरज #RRvsPBKS 

राजस्थानला तिसरा झटका, बटलर 25 धावांवर बाद

IPL 2021 RR vs PBKS Live Score : राजस्थानला तिसरा झटका, बटलर 25 धावांवर बाद, 8 षटकानंतर राजस्थानच्या 3 बाद 78 धावा #RRvsPBKS 

राजस्थानला दोन धक्के,  बेन स्टोक्सनंतर मनन वोहराही बाद

IPL 2021 RR vs PBKS Live Score : राजस्थानला दोन धक्के,  बेन स्टोक्सनंतर मनन वोहराही बाद  #RRvsPBKS

राजस्थानसमोर 222 धावांचं आव्हान

IPL 2021 RR vs PBKS Live Score : कर्णधार केएल राहुल आणि दीपक हुडाची धमाकेदार खेळी, राजस्थानसमोर 222 धावांचं आव्हान  #RRvsPBKS 

IPL 2021 RR vs PBKS Live Score : केएल राहुलची धमाकेदार खेळी संपुष्टात, 91 धावांवर बाद #RRvsPBKS

IPL 2021 RR vs PBKS Live Score : केएल राहुलची धमाकेदार खेळी संपुष्टात, 91 धावांवर बाद  #RRvsPBKS

पंजाबच्या 200 धावा पूर्ण, केएल राहुलच्या नाबाद 79 धावा

IPL 2021 RR vs PBKS Live Score : पंजाबच्या 200 धावा पूर्ण, केएल राहुलच्या नाबाद 79 धावा, पूरन शून्यावर बाद, पंजाबची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल  #RRvsPBKS

दीपक हुडा 28 चेंडूत 64 धावा करुन बाद

IPL 2021 RR vs PBKS Live Score : केएल राहुल आणि दीपक हुडाची अवघ्या 45 चेंडूत 100 धावांची भागिदारी, दीपक हुडा 28 चेंडूत 64 धावा करुन बाद #RRvsPBKS 

दीपक हुडाचं अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक

IPL 2021 RR vs PBKS Live Score : दीपक हुडाचं अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक, आतापर्यंत लगावले सहा षटकार #RRvsPBKS 

केएल राहुलसह दीपक हुडाची शानदार फटकेबाजी


IPL 2021 RR vs PBKS Live Score : केएल राहुलसह दीपक हुडाची शानदार फटकेबाजी, पंजाबच्या 15 षटकानंतर 2 बाद 161 धावा #RRvsPBKS

कर्णधार केएल राहुलचं शानदार अर्धशतक, दीपक हुडाचीही फटकेबाजी

IPL 2021 RR vs PBKS Live Score : कर्णधार केएल राहुलचं शानदार अर्धशतक, दीपक हुडाचीही फटकेबाजी, पंजाबच्या 13 षटकानंतर 2 बाद 130 धावा

ख्रिस गेल 40 धावांवर बाद, परागनं घेतली विकेट, पंजाबच्या 11 षटकानंतर 2 बाद 102 धावा

IPL 2021 RR vs PBKS Live Score : ख्रिस गेल 40 धावांवर बाद, परागनं घेतली विकेट, पंजाबच्या 11 षटकानंतर 2 बाद 102 धावा

यांक अगरवाल बाद, पंजाबला पहिला धक्का

IPL 2021 RR vs PBKS Live Score : मयांक अगरवाल बाद, पंजाबला पहिला धक्का, केएल राहुलसह ख्रिस गेल मैदानात #RRvsPBKS  

राजस्थाननं नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

IPL 2021 RRvsPBKS : राजस्थाननं नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

पंजाब किंग्स: 

केएल राहुल (कर्णधार), ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, शाहरूख खान, दीपक हुड्डा, ख्रिस जॉर्डन, अर्शदीप सिंह, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी, झाय रिचर्डसन

रायस्थान रॉयल्स: 

संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैयस्वाल, बेन स्टोक्स, राहुल तेवतिया, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाळ, मुस्ताफिजुर रहमान, कार्तिक त्यागी, चेतन सकारिया

मागील वर्षीचा पंजाब आणि राजस्थानचा सामना :

गेल्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्सची कामगिरीही सुमारच राहिली. 14 सामन्यांपैकी 8 सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यंदा दोन्ही संघ चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असतील.

पंजाब किंग्सचे खेळाडू :

पंजाब किंग्सकडे  केएल राहुल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, दीपक हुड्डा अशी तगड्या फलंदाजांची फौज आहे. तर मोहम्मद शमी, झाय रिचर्डसन असे अनुभवी गोलंदाज देखील आहेत. 

राजस्थान रॉयल्सचे खेळाडू :

संघात राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाल असे तगडे ऑलराऊंडर आहेत. त्याचबरोबर मुस्ताफिजुर रहमान, कार्तिक त्यागी, चेतन सकारिया असे गोलंदाज आहे. स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर हा सामना खेळू शकणार नाही. 

राजस्थान रॉयल्सकडे जोस बटलर, बेन स्टोक्ससह कर्णधार संजू सॅमसन, यशस्वी जैयस्वाल यांच्याकडून तडाखेबाज खेळीची अपेक्षा आहे.

राजस्थान रॉयल्सकडे जोस बटलर, बेन स्टोक्ससह कर्णधार संजू सॅमसन,  यशस्वी जैयस्वाल यांच्याकडून तडाखेबाज खेळीची अपेक्षा आहे.

पार्श्वभूमी

आज आयपीएलमधील चौथा सामना पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. पंजाबचं नेतृत्व केएल राहुलकडे आहे, तर यंदा पहिल्यांदाच संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सची धुरा सांभाळणार आहे. मागील आयपीएलमध्ये राजस्थानचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर फेकला गेला होता.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.