सांगली : सध्या नगरपंचायतींच्या निवडणुकांची धामधूम सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे आहेत. यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील देखील आघाडीवर आहेत. या निवडणुकीचा निकाल 19 तारखेला स्पष्ट होईल, त्यावेळी माझ्या बापाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही असे म्हणत कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रोहित पाटील यांनी सर्व विरोधकांना आव्हान दिलं आहे. 


रोहित पाटील म्हणाले की, आता ज्यांच्या हाती 15 वर्षे सत्ता होती, नगरपंचायत होती आज तेच लोक आदर्श नगरपंचायत घडवण्यासाठी एकत्र आलो आहे, असं म्हणत आहेत. मी कवठेमहांकाळचा परिसर संपूर्ण पिंजून काढला आहे. विस्तारित भाग आणि तिथली परिस्थिती काय आहे हे मला माहीत आहे. विकासाच्या मुद्द्यावर ज्यांना निवडणूक लढवायची आहे, जे लोक मला सल्ले देण्याचे काम करत आहेत त्यांनी या शहरात काय विकास कामे प्रलंबित आहेत, हे माझ्या पुढे येऊन सांगावं,' असं आव्हान रोहित पाटील यांनी केलं. 






कवठेमहांकाळ येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सांगता समारंभ प्रसंगी बोलताना दिले. रोहित पाटील यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. कवठेमहांकाळ नगरपालिका निवडणुकीत प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. राष्ट्रवादीच्या प्रचार सांगता सभेत रोहित आर.आर. पाटील यांनी तुफान फटकेबाजी करत कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत एकत्र आलेल्या सर्व विरोधकांना आव्हान दिलं आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha