Rohit Pawar On Bjp: भाजपकडून सातत्यानं बारामती आणि पवार कुटुंबावर निशाणा साधला जात आहे. यावरुन भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अनेकदा जुंपल्याचंही पाहायलं मिळतं. आता पवार फॅमिलीचे सदस्य आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपला टोमणेवजा सल्ला दिला आहे. रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, भाजपच्या नेत्यांनी बारामतीत आलंच पाहिजे. तेथे झालेला विकास त्यांनी समजून घेतला पाहिजे. तसेच बारामतीत जो विकास झालाय त्या मुद्द्यावरूनच राजकारण करायला हवं, असा सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे. 


ते म्हणाले की, एखादी व्यक्ती नव्याने प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या बातम्या होणं ही तितकंच महत्त्वाचं असतं, असं म्हणत रोहित पवारांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना टोला लगावला.   जेव्हा एखादी व्यक्ती नव्याने प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या बातम्या होणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे चंद्रशेखर बावनुळे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रयत्न करतील. मात्र, बारामतीत आमचा लोकांवर विश्वास आहे. तिथले लोक कोणत्या बाजूचे आहेत, कोणत्या विचाराचे आहेत हे आम्हाला माहिती आहे, असं ते म्हणाले. 
 
रोहित पवार एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, आज बारामती पवारमुक्त करायची, मुंबई ठाकरेमुक्त करायची या दोन विषयांवर भाजपाचं राजकारण केंद्रीत आहे. मात्र, सामान्यांच्या रोजगाराचे प्रश्न, बेरोजगारी कमी करणं, शेतकऱ्यांचे विषय, शहरी-ग्रामीण विषय यावर भाजपाचे नेते बोलत नाहीत, असं त्यांनी म्हटलं.


ते पुढे म्हणाले की,  भाजपच्या नेत्यांनी बारामतीत आलंच पाहिजे. तेथे झालेला विकास त्यांनी समजून घेतला पाहिजे. तसेच बारामतीत जो विकास झालाय त्या मुद्द्यावरूनच राजकारण करायला हवं. मी गणपती बाप्पांकडे सत्तेची प्रार्थना केली नाही. मात्र, राजकारणाची पातळी खाली जात आहे. त्याऐवजी लोकांच्या विकासावर राजकारण व्हावं आणि सुडाचं राजकारण थांबावं. भावनिक विषयांवर राजकारण न होता विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण व्हावं, अशी प्रार्थना मी गणपतीरायांना केली, असंही रोहित पवार यांनी म्हटलं.


बारामती दौऱ्यावर असताना काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे


बारामती दौऱ्यावर असताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की, 24 ला आम्ही बारामतीसहित अनेक लोकसभा जिंकू. आतापर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha constituency) याआधी कधी फाईट झाली नाही, तशी फाईट होईल. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र लढून बारामती लोकसभा जिंकणार म्हणजे जिंकणारच असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला होता.


इतर महत्वाच्या बातम्या


Chandrashekhar Bawankule : बारामती जिंकणार म्हणजे जिंकणारच, बावनकुळेंचा विश्वास, 2024 ला भाजपचं महाराष्ट्रात 45 प्लस


बारामतीचा गड उध्वस्त करणं इतकं सोपं वाटतं का?, निलेश लंकेंचं बारामती दौरा करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना प्रत्युत्तर