Rohit Pawar on Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासारखा व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असल्यास राज्याचा नक्कीच फायदा होईल, असं वक्तव्य कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलं आहे. अजितदादांकडे असलेल्या अनुभवामुळं राज्यातील नागरीकांना योग्य वेळी निर्णय घेतल्याचा फायदा होईल असेही रोहित पावर यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आयोध्या दौऱ्यावर देखील रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आयोध्या दौरा करावा मात्र, त्यावरून राजकारण करु नये असं मत रोहित पवारांनी व्यक्त केलं.
सरकारनं लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी
अजित दादांसारखी व्यक्ती लगेच निर्णय घेऊ शकते. प्रशासनाला विश्वासात घेऊ शकते. महाराष्ट्रावर अडचण येईल तेव्हा राजकारणाचा विचार न करता अजित पवार पवार निर्णय घेतात असे रोहित पवार म्हणाले. दरम्यान, सरकारनं लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी असे रोहित पवार म्हणाले. मागच्या वेळी राज्यात 110 टक्के पाऊस झाला तेव्हा विरोधक ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागमी करत होते. आता 126 टक्के पाऊस झाला असूनही ओला दुष्काळ जाहीर करत नसल्याचे रोहित पवार यावेळी म्हणाले.
आदित्य ठाकरेंचं रोहित पवारांनी केलं स्वागत
भाजप आमदार आमदार नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेली नोट ट्विट केली होती. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, नोटांवर कुणाचा फोटो असावा यापेक्षा ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यांना ओला दुष्काळ जाहीर करुन मदत मिळावी हा विषय महत्वाचा असल्याचं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं. सध्या युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहे. अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. यावेळी रोहित पवारांनी त्यांचेही स्वागत केलं.
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्याकडं लक्ष घालावं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत, याबाबत बोलताना त्यांनी आयोध्या दौरा करावा मात्र त्यावरून राजकारण करू नये असं मत रोहित पवारांनी व्यक्त केलं. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, त्यांनी दिवाळी निमित्ताने जनतेशी संवाद साधला ठीक आहे, पण सरकारने जो आनंदाचा शिधा वाटला तो कुणापर्यंत पोहोचला कुणापर्यंत पोहोचला नाही हे पाहावं लागेल. सोबतच आज शेतकऱ्यांना हातामध्ये मदत पाहिजे आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे सरसकट पंचनामे व्हावेत, त्याकडं मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं असंही रोहित पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: