Aurangabad News: दिवाळीत फटाके फोडताना तरुण वेगवेगळ्या पद्धतीने स्टंट करत असल्याच्या काही घटना समोर आल्या असतानाच, आता औरंगाबाद येथील फटाके फोडताना जीवघेणा स्टंट करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ समोर आला आहे. डोक्यावर रॉकेटचा बॉक्स ठेवून ते फोडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, हा औरंगाबादच्या जवाहरनगर परिसरातील असल्याचे बोलले जात आहे. 


प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबाद शहरात रात्री एका तरुणाने आकाशात उडणारे रॉकेट फटाक्याच मोठ बॉक्स हातात घेऊन वाहतूक सुरु असलेल्या रस्त्यावरच फोडायला सुरुवात केली. धोकादायक पद्धतीने फिरून हा तरुण ते रॉकेट सोडत होता. आजूबाजूला दुकाने घर यांची कोणतीही पर्वा न करता रहिवाशी भागात तरुण फटाके फोडत होता. एवढच नाही तर स्वतः च्या डोक्यावर रॉकेट फटाक्याच मोठ बॉक्स धरून रॉकेट सोडत होता. या तरुणाचा व्हिडिओ सध्या व्हायरलं होत असून, हा व्हिडिओ शहरातील जवाहरनगर परिसरातील असल्याचे समोर आले आहे.





धक्कादायक व्हिडिओ! तरुणांचा एकमेकांच्या अंगावर फटाके फेकण्याचा स्टंट; औरंगाबादमधील संतापजनक प्रकार