मुंबई : सरकारच्या दबावाखाली ईडीने (ED)  काही चुकीची कारवाई केली तर घाबरुन जाऊ नये, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ईडी (ED)  चौकशीबाबत दिली आहे. ईडी अधिकाऱ्यांना यापूर्वी सहकार्य केलं तसंच आताही करणार आहे. शरद पवार बाप माणूस म्हणून ढाल बनून उभे राहतात. माझ्यासाठी तर हे भारावणारं आहे. या वयातही महाराष्ट्राचा  सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा  आहे, असे आवाहन  रोहित पवारांनी केले आहे.

रोहित पवार म्हणले, ईडी अधिकाऱ्यांना यापूर्वी सहकार्य केलं. तसंच आताही करणार मात्र सूडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवरसरकारचा दबाव आहे. दबावाखाली माझ्यावर ईडीने चुकीची कारवाई केल्यास घाबरुन जाऊ नये. पवार साहेबांसोबत सर्वांनी एकजुटीने उभं राहावं. कारण कुणापुढेही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचाय आणि महाराष्ट्र धर्म जपायचा आहे. माझ्या कुटुंबासाठी, कोवळ्या वयातील मुलांसाठी हे राजकारण न समजण्याच्या पलिकडचं आहे. पण तरीही सर्वजण खंबीरपणे माझ्यासोबत आहेत.

वय झालं म्हणून काय झालं?

रोहित पवार म्हणाले,  उद्या सुप्रिया सुळे आणि शरद पवार माझ्यासोबत येत आहेत. वय झालं म्हणून काय झालं? वय झालेली माणसं तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात. माझ्यासाठी तर हे भारावणारं आहे. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर आणखी काय हवंय!  

रोहित पवारांच्या समर्थनात पक्ष शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयाच्या जवळच ईडीचं कार्यालय आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ईडी कार्यालयाच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.  

हे ही वाचा :

मोठी बातमी: रोहित पवारांच्या ED चौकशी दिवशी शरद पवार दिवसभर कार्यालयात बसणार, सुप्रिया सुळे ईडी कार्यालयापर्यंत जाणार!