धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरातील सेंट्रल बँकेच्या शाखेत आज सायंकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास दरोडा टाकल्याची घटना घडली आहे.


दोन हेल्मेटधारी मोटारसायकलस्वारांनी कॅशियर आणि व्यवस्थापकांना चाकूचा धाक दाखवून 10 लाख 26 हजार रुपये लुटून नेले आहेत. या घटनेनंतर जिल्ह्यात सर्वत्र नाका बंदी करण्यात आली आहे.

सायंकाळच्या वेळी दोन हल्मेटधारी व्यक्ती बँकेत घुसले. त्यांनी कॅशियर आणि व्यवस्थापकांना चाकूचा धाक दाखवून सर्व नव्या नोटांचा समावेश असलेली 10 लाख 26 हजार रुपयांची रोकड लांबवली.