बीड : चोरट्यांनी चक्क न्यायालयातच चोरी केल्याची घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयातील स्ट्राँग रूम फोडून चोरट्यांनी सोन्यावर डल्ला मारला. खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि सोनं लंपास केलं.



विशेष म्हणजे अंबाजोगाई शहरातील योगेश्‍वरी देवीच्या अंगावरील सोने चोरीला गेलं होतं. पोलिसांनी तपासादरम्यान ते सोनं हस्तगत केलं आणि ते न्यायालयामध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याच सोन्यावर चोरट्यांनी पुन्हा एकदा डल्ला मारला.



चोरट्यांनी फोडलेल्या स्ट्राँग रुममध्ये काही बँकेच्या एफडी चेकबुक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योगेश्‍वरी देवीच्या अंगावरील चोरीला गेलेले दागिने होते. न्यायालयाही सुरक्षित नसल्याने सर्वसामान्यांचं काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.