Aurangabad Crime News : गेल्या आठवड्यात औरंगाबाद (Aurangabad) शहरात भरदिवसा लुटमारीची घटना समोर आली होती. औरंगाबाद शहर पोलिसांच्या वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा एका सराफा व्यावसायिकास चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले होते. दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास रांजणगावात हा सर्व प्रकार समोर आला होता. ज्यात व्यापाऱ्याच्या हातावर चाकूने वार करत अंदाजे साडेबारा लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला होता. विशेष म्हणजे, सराफा दुकान लुटल्याची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद कैद झाले होते. तर, गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर भरदिवसा लुटमार करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, महागड्या मोबाईलचे हप्ते फेडण्यासाठी दरोड्याचे सिनेमा पाहून ही चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. योगेश शंकर तायडे (वय 22 वर्षे, रा. बाळकृष्ण म्हात्रे चाळ नंबर 2, डोंबिवली पूर्व, ता. कल्याण, जि. ठाणे, मूळ गाव नागसेननगर, पाचोरा, जळगाव), नीलेश मधुकर सोनवणे (वय 19 वर्षे, रा. नागसेननगर, पाचोरा, ह.मु. रांजणगाव शेणपुंजी, गंगापूर), अरमान शेनफड तडवी (वय 24 वर्षे, रा. देऊळगाव गुजरी, ता. जामनेर, जि. जळगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
वाळूज भागातील रांजणगाव परिसरात भरदिवसा सराफा दुकान लुटीची घटना समोर आली होती. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. आर्थिक परिस्थिती योग्य नसताना देखील घेतलेल्या महागड्या मोबाईल फोनचे हप्ते फेडण्यासाठी पैसे नसल्याने आरोपींनी सराफा दुकान फोडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, चोरी करण्यापूर्वी या आरोपींनी दरोड्याचे सिनेमा पाहिले. त्यातून चोरी कशी करावी याचा अभ्यास केला आणि त्यानंतर सराफा दुकानात दरोडा टाकला. मात्र, पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत या आरोपींना अखेर बेड्या ठोकत अटक केली आहे.
भर दिवसा घातला होता दरोडा...
वाळूज भागातील रांजणगावात मुकुंद उत्तमराव बेदरे यांची सराफा दुकान आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे त्यांनी ते दुकान उघडली होती. मात्र, साडेअकरा वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या दुकानात एकाने प्रवेश केला. काही कळण्याच्या आताच दुकानात आलेल्या चोराने काऊंटवरुन उडी मारत बेदरे यांच्यावर हल्ला केला. त्यांना मारहाण करायला सुरवात केली. यावेळी दोघांमध्ये झटापट सुरु असतानाच आणखी दोघेजण दुकानात आले. त्यांनी आतमधून शटर लावून घेतले. याचवेळी एकाने बेदरे यांच्या हातावर थेट चाकूचा वार केला. त्यामुळे बेदरे घाबरले आणि जिवाच्या भितीने त्यांनी माघार घेत शांत बसले. तर दुकानात आलेल्या तिघांपैकी दोघांनी रॅकमधील दागिने बँगामध्ये भरले. त्यानंतर ते तेथून पसार झाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या: