मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 08 Mar 2018 09:08 AM (IST)
मुंबई-गोवा महामार्ग लोणेरे येथे झालेल्या भीषण अपघात तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
रायगड : मुंबई-गोवा महामार्ग लोणेरे येथे झालेल्या भीषण अपघात तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दोन ट्रकची समोरासमोर झालेली धडक आणि त्यामुळे ट्रकला लागलेल्या भीषण आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. दरम्यान, यावेळी मागून वेगात येणाऱ्या मोटरसायकल स्वारानेही ट्रकला जोरदार धडक दिली. ज्यात त्याचाही मृत्यू झाला. हा अपघात आज पहाटेच्या दरम्यान घडला. हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये दोन्ही ट्रकचा अक्षरश: चक्काचूर झाला. दरम्यान अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती. सध्या पोलीस घटनास्थळी पोहचले असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.