पैसे देण्यास नकार दिल्यामुळे विवाहितेवर सामूहिक बलात्कार
एबीपी माझा वेब टीम | 08 Mar 2018 08:39 AM (IST)
मालेगाव शहरातील बोरीचा मळा भागात चार नराधमांनी एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आहे.
मालेगाव : मालेगाव शहरातील बोरीचा मळा भागात चार नराधमांनी एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आहे. विवाहित महिला आपल्या मेव्हण्यासोबत दुचाकीवरुन खड्डाजीन परिसरातून जात असताना चारही आरोपींनी त्यांची दुचाकी अडवत 20 हजार रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिला असता मेव्हण्याला बेदम मारहाण करुन चौघांनी आळीपाळीने बलत्कार केल्याला आरोप पीडितेने केला आहे. याप्रकरणी सिटी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला असून माजिद कुरैशी या संशयितांना अटक केली असून अन्य तिघांचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.