पुणे : पुणे- अहमदनगर रोडवर चासगाव परिसरात आज सकाळी झालेल्या अपघातात दोन वारकरी महिलांचा मृत्यू झाला आहे. कुसुमबाई घाडगे आणि द्रौपदा वाणी असे या महिलांची नावे आहेत.


 

या दोन्ही मृत महिला जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रहिवासी असून त्या पंढरीच्या वारसाठी नगरकडून पुण्याला जात होते. तर वाहन पुण्यावरुन नगरला येताना हा अपघात झाला.

 

या अपघातानंतर वाहनचालक फरार असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.