आधिक माहितीनुसार, मडगांव-निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये रत्नागिरीजवळ काही तांत्रिक बिघाड आला. यामुळे रत्नागिरीजवळील बोगद्यापाशी ही ट्रेन थांबवण्यात आली. मोटरमन आणि टेक्निशिअन ट्रेनच्या इंजिनमध्ये कुठे बिघाड झाला आहे, याचा शोध घेत होते. पण ट्रेन उतारावर थांबल्याने ती तब्बल 15 किमी धावली.
दरम्यान, ही ट्रेन 'विना ड्रायव्हर' 15 किमी धावल्याच्या वृत्ताला कोकण रेल्वेचे संचालक संजय गुप्ता यांनी फेटाळले असून उतारावर काही अंतरावर ही ट्रेन चालल्याचे म्हटले आहे. तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
या ट्रेनच्या इंजिनमधील व्हॅक्यूम ब्रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या ट्रेनला थांबवण्यात आले होते. यानंतर या ट्रेनला दूसरे इंजिन जोडून ही पुढे पाठवण्यात आली.