रितेश देशमुखने जलयुक्त लातूरसाठी 25 लाखांचा निधी दिला आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या या लेकाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लातूरकरांसाठी मदतीचा हात दिला आहे.
राज्यातील दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी अभिनेता आमीर खान आणि लेखक- दिग्दर्शक सत्यजीत भटकळ यांनी पुढाकार घेतला आहे. त्यादृष्टीने ‘पाणी फाऊंडेशन’मार्फत राज्यभरात गावागावात जाऊन जलसंधारणाची कामं करण्यात येत आहेत. आमीर – सत्यजीतची या कामांसाठी भन्नाट कल्पना आहे.
‘पाणी फाऊंडेशन’ने ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘पाणी फाऊंडेशन’च्या या उपक्रमाशी सचिन तेंडुलकर, रतन टाटा यासारख्यांचाही सहभाग आहे.
आमीरची 'वॉटर कप स्पर्धा' जोमात, दुष्काळ कायमचा हटवण्याचा निर्धार
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना दिलासा दिला आहे. जलयुक्त शिवार अभियानासाठी अक्षयने 50 लाखांची मदत केली आहे.
अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जलयुक्त शिवार योजनेसाठी मदत करत असल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भातलं ट्विट केलं होतं.
अक्षयकुमारची महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना 50 लाखांची मदत
अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्तांसाठी मदत करण्यास सुरुवात केल्यानंतर बळीराजाला मदत करण्यासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे. अभिनेता आमीर खान, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनीही दुष्काळग्रस्तांना मदत केली होती.