दहावीच्या आधीच्या वेळापत्रकात चार महत्वाचे पेपर सलग असल्यानं विद्यार्थी आणि पालकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. पेपरमध्ये एक दिवसाचे अंतर नसल्याने अभ्यास कसा करणार असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आला होता. महत्वाच्या पेपर दरम्यान, सुट्टी हवी अशी बोर्डाकडे मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, एका पत्रकाद्वारे शिक्षण मंडळानं सुधारित वेळापत्रकाबद्दल माहिती दिली आहे. 10वीच्या इतिहास, भूगोल यासह सर्वच मुख्य पेपर सलग न ठेवता एक दिवसाची सुट्टी देऊन वेळापत्रक बदलण्यात आलं आहे. दरम्यान सविस्तर वेळापत्रक शिक्षण मंडळाच्या https://mahahsscboard.maharashtra.gov.in/ वेबसाईटवर पाहता येईल.
एकीकडे दहावीच्या परीक्षेचं वेळापत्रक बदललं असलं तरी 12वीच्या परीक्षा वेळापत्रकात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दहावी, बारावी परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भातील अधिक माहिती शिक्षण मंडळाच्या https://mahahsscboard.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
संबंधित बातम्या:
'दहावीच्या वेळापत्रकात बदल करा'