शिर्डी : नोटाबंदीच्या निर्णयाला 51 दिवस पूर्ण झाले आहेत. एकीकडे लोकांकडे पैसे नाहीत असा दावा केला जात असताना, तिकडे शिर्डीत मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळतंय.


नोटबंदी निर्णयाचा साईंच्या दानावर कोणताही परिणाम झालेला नाही. कारण नोटाबंदीनंतर म्हणजेच गेल्या 50 दिवसात साईचरणी तब्बल 31 कोटी 73 लाखांच दान जमा झालं आहे.

या व्यतिरिक्त व्हीआयपी पेड दर्शनाच्या माध्यमातून 3 कोटी 18 लाख रुपये दान म्हणून जमा झालं आहे.

साईचरणी नोटा, सोन्याचा ढिग


  • 2 किलो 900 ग्राम सोने

  • 56 किलो चांदी

  • दानपेटीत 18 कोटी 96 लाख.

  • देणगी काऊंटरवर 4 कोटी 25 लाख रुपये

  • ऑनलाईन 6 कोटी 66 लाख.

  • डेबीट / क्रेडीट कार्डद्वारे 2 कोटी 62 लाख

  • चेक / डीडी - 3 कोटी 96 लाख

  • प्रसादालय मोफत अन्नदान योजना - 16 लाख रुपयांच दान

  • 50 दिवसात 4 कोटी 53 लाखांच्या 1 हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा

  • तर 3 कोटी 80 लाखांच्या नव्या नोटा साईचरणी अर्पण