अहमदनगरमध्ये वाळू तस्करांवर मोठी कारवाई, 17 लाखांच्या बोटी उद्ध्वस्त
एबीपी माझा वेब टीम | 26 Nov 2016 10:23 AM (IST)
अहमदनगर : अहमदनगरमध्ये वाळू तस्कऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. 17 लाखांच्या 5 बोटी महसूल विभागाने उद्ध्वस्त केल्या. अशाप्रकारे धडक कारवाई केल्याने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे. अहमदनगरच्या श्रीगोंद्यात वाळू तस्करी करणाऱ्या 17 लाखांच्या बोटी उद्ध्वस्त केल्या गेल्या आहेत. महसूल विभागानं केलेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. भीमा नदीच्या पात्रातून या बोटींद्वारे वाळू तस्करी केली जात होती. एकूण 5 बोटी याठिकाणी होत्या. अनेक ठिकाणचे लिलाव झालेले नसतानाही याठिकाणीहून अवैधपणे वाळूची तस्करी सुरु होती. पाहा व्हिडीओ -