औरंगाबाद : राज्यात आज तिसऱ्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकांची मतमोजणी पार पडली. औरंगाबाद जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात एकूण 4 नगरपालिकांसाठी निवडणूक झाली होती. आज त्यांचा निकाल लागला.

औरंगाबादमधील तिसऱ्या टप्प्यातील चार नगरपालिकांध्ये दोन ठिकाणी काँग्रेसची सत्ता, एका ठिकाणी भाजप-शिवसेना युतीची सत्ता, तर पैठणला नगराध्यक्ष भाजपचा, मात्र संख्याबळ शिवसेनेचे अधिक आहे.

 

औरंगाबादमधील तिसऱ्या टप्प्यातील सर्व नगरसेवकांची संख्या 80 आहे. यापैकी भाजप 11, शिवसेना 20, काँग्रेस 33, राष्ट्रवादी काँग्रेस 8, एमआयएम 2, तर अपक्ष आणि आघाडी 6 जागी विजयी.

खुलताबाद नगरपालिका (एकूण जागा - 17)

भाजप - 4

शिवसेना - 3

काँग्रेस - 8

राष्ट्रवादी काँग्रेस - 2

नगराध्यक्ष - काँग्रेसचे अॅड. एस. एम. कमर (भाजपच्या नवनाथ बारगळ यांचा पराभव)

 

गंगापूर नगरपालिका (एकूण जागा - 17)

भाजप - 2

शिवसेना - 8

काँग्रेस - 7

राष्ट्रवादी काँग्रेस - 0

नगराध्यक्ष - भाजपच्या वंदना पाटील (भाजप-शिवसेना युती), (काँग्रेसच्या सुवर्णा जाधव यांचा पराभव)

कन्नड नगरपालिका (एकूण जागा - 23

भाजप - 00

शिवसेना - 2

काँग्रेस - 14

राष्ट्रवादी काँग्रेस- 00

रायभान जाधव आघाडी - 4

अपक्ष - 1

एमआय एम - 2

नगराध्यक्ष - काँग्रेसच्या स्वाती कोल्हे (रायभान जाधव आघाडीच्या सरला वाडीकर यांचा पराभव)

पैठण नगरपालिका : (एकूण जागा - 23

भाजप - 5

शिवसेना - 7

काँग्रेस - 4

राष्ट्रवादी काँग्रेस- 6

अपक्ष -1

नगराध्यक्ष - भाजपचे सुरज लोळगे (शिवसेनेच्या राजू परदेशी यांचा पराभव)