Resident Doctor Strike in Maharashtra : आपल्या प्रलंबित मागण्यासाठी राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी (Resident Doctor) कालपासून संपाची हाक दिली असून, आज दुसऱ्या दिवशी देखील निवासी डॉक्टर संपावर ठाम आहेत. त्यामुळे अनेक शासकीय रुग्णालयात आज ओपीडी बंद असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यासोबत डॉक्टरांच्या मार्ड संघटनेची काल बैठक देखील झाली, मात्र, त्यात कोणताही तोडगा निघाला नसल्याने गुरुवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून निवासी डॉक्टर संपावर गेले असून, आजचा दुसरा दिवस आहे. 


राज्यभरातील निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन वेळेवर मिळत नसल्याने प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे अशी मागणी निवासी डॉक्टरांची आहे. तसेच, निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी,  निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन ही केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे, या तीन मागण्यासाठी निवासी डॉक्टर यांनी संपाची हाक दिली आहे. त्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. विशेष म्हणजे आज दिखील निवासी डॉक्टरांच्या संघटनांसोबत प्रशासनाची बैठक होनरा असून, यात काही तोडगा निघणार का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 


बीड जिल्ह्यातील निवासी डॉक्टरही संपावर...


मार्डच्या डॉक्टरांनी विविध मागण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून संप पुकारला आहे. या संपाचा आज दुसरा दिवस असून, बीडच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील 205 डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना पाहायला मिळत आहे. आंदोलनाच्या कालावधीत फक्त बाह्य रुग्ण विभागातील सेवा बंद राहणार असून, अत्यावश्यक सेवा ज्यामध्ये अपघात विभाग, सर्व आयसीयु व तातडीच्या सर्व शस्त्रक्रिया सेवा सुरू आहे. 


संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयातील 532 निवासी डॉक्टर बेमुदत संपावर


गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयातील 532 निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे घाटीतील रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मात्र, अतिदक्षता विभाग, प्रसुती विभागासह शस्त्रक्रियासारख्या गंभीर रुग्णसेवेवर परिणाम होणार नसल्याचे घाटी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहेत. दरम्यान, निवासी डॉक्टरांच्या वतीने आज घाटी रुग्णालयाच्या परिसरात आज निदर्शने देखील करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी! सरकारसोबत झालेली बैठक निष्फळ; निवासी डॉक्टर संपावर ठाम