Kokan Heavy Rain : राज्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु असून ठिकठिकाणी पाणी साचल आहे. पावसाची संततधार कायम आहे. कोकणातही मुसळदार पाऊस सुरु आहे. कोकणातील मुसळधार पावसाचा फटका आता कोकण रेल्वेला बसला आहे. मुसळधार पावसामुळे तीन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. कोकण रेल्वेनं परिपत्रक जारी करत या संदर्भात माहिती दिली आहे. कोकण रेल्वेवरील कोकणकन्या एक्सप्रेस, मडगाव एक्सप्रेस आणि दादर-सावंतवाडी एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.


कोकण रेल्वे मार्गावरील कुडाळ - झाराप दरम्यान मुसळधार पावसामुळे दादर-सावंतवाडी एक्सप्रेस-तुतारी एक्सप्रेस तसेच कोकणकन्या एक्सप्रेस आणि मडगाव एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.


बदललेल्या गाड्यांचे वेळापत्रक :



  • गाडी क्र. 01140 मडगाव जंक्शन - नागपूर स्पेशल (Madgaon Jn. - Nagpur Special), ही गाडी 20/07/23 रोजी मडगाव जंक्शनहून 19:00 वाजता सुटण्याची वेळ बदलण्यात आली आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार, ही गाडी मडगाव जंक्शनहून 22:00 वाजता म्हणजे तीन तास उशिराने सुटेल.

  • गाडी क्र. 20112 मडगाव जंक्शन - मुंबई सीएसएमटी कोकणकन्या एक्स्प्रेस (Madgaon Jn. - Mumbai CSMT Konkankanya Express), जी 20/07/23 रोजी मडगाव जंक्शनहून 18:00 वाजता या नियोजित वेळेत सुटणार होती, ही गाडी आता मडगाव जंक्शनहून 21:00 वाजता म्हणजे तीन तास उशिराने सुटेल.

  • गाडी क्र. 11004 सावंतवाडी रोड - दादर तुतारी एक्स्प्रेस (Sawantwadi Road - Dadar Tutari Express), जी 20/07/23 रोजी, सावंतवाडी रोडहून संध्याकाळी 17:55 वाजता सुटणार होती, या गाडीच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. सावंतवाडी रोड - दादर तुतारी एक्स्प्रेस आज सावंतवाडीहून 20:55 वाजता म्हणजे तीन तास उशिराने सुटेल.


कोकणात जोरदार पावसाची हजेरी


कोकणासह राज्याला पावसानं चांगलंच झोडपलं आहे. ठिकठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. नद्या दुथडी भरून वाहताना दिसत आहेत. या पावसामुळे चिपळूणमधील परशुराम घाटातल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती जमा झाल्याचं चित्र आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. रायगडमधील इर्शाळगड येथे दरड कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे. सलग तीन दिवस राज्यभरात पावसानं दाणादाण उडवली आहे. नदी-नाल्यांना पूर आला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Irsalwadi Landslide: पावसामुळे इर्शाळवाडीतील बचावकार्य थांबवलं; 98 जणांना वाचवण्यात यश, 16 जणांचा मृत्यू