- देशातल्या आठ प्रमुख शहरांमध्ये नव्या प्रकल्पांच्या बांधकामात 41 टक्के घट
- चेन्नई वगळता इतर महत्त्वाच्या आठ शहरांमध्ये बांधकाम व्यवसायाला नोटाबंदी आणि ‘रेरा’चा फटका
- मुंबईत नवीन प्रकल्पांच्या उभारणीत 36 टक्के घट
- दिल्ली एनसीआरमध्ये 73 टक्क्यांची घट
- अहमदाबादमध्ये नवीन प्रकल्पांचं प्रमाण 79 टक्के घटलं
आधी ‘रेरा’ आणि आता ‘जीएसटी’... गृह प्रकल्पांचा वेग मंदावला!
एबीपी माझा वेब टीम | 06 Jul 2017 03:33 PM (IST)
फाईल फोटो
पुणे : बांधकाम व्यवसायावर नियंत्रण आणण्यासाठी लागू करण्यात आलेला ‘रेरा’ कायदा आणि केंद्र सरकारने नव्यानं लागू केलेला जीएसटी यांचा थेट परिणाम आता बांधकाम व्यवसायावर होताना पहायला मिळतो आहे. ‘रेरा’अंतर्गत बिल्डरांना अनेक निर्बंध पाळावे लागणार आहेत, तर जीएसटी आल्यानंतरही महापालिकांचा एलबीटी कायम असल्यामुळे घरांच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. त्यामुळे एका बाजूला बिल्डर आणि दुसऱ्या बाजूला ग्राहक अशा दोघांसाठीही अडचणी उभ्या राहिल्याचंच चित्र दिसून येतं आहे. अब्जावधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या बांधकाम व्यवसायावर नियंत्रण आणण्यासाठी म्हणून रेरा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत प्रकल्प पूर्ण करायला लागणाऱ्या वेळेची हमी देणं, त्या वेळेत तो पूर्ण नाही झाला तर होणारी दंडात्मक कारवाई अशी टांगती तलवार बिल्डरांवर आली आहे. त्याचाच परिणाम म्हणून गृह प्रकल्पांच्या बांधणीचा वेग ही मंदावला आहे. कुठल्या शहरावर किती परिणाम?