Cruise Drugs Case : अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानशी (Aryan Khan) संबंधित ड्रग्ज प्रकरणाचा (Drugs Case) तपास योग्य पद्धतीने झाला नसल्याचं समोर आलंय. एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयात पाठवलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आलीय. तपासादरम्यान समोर आलेल्या त्रुटींच्या अहवालानुसार हा अंदाज वर्तवण्यात आलाय.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या विशेष तपास पथकाने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक खुलासा केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयात पाठवलेल्या या अहवालात या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला नसल्याचं सांगण्यात आलंय. त्यावेळी जे अधिकारी कार्यरत होते ते आजही कार्यरत आहेत. त्यांच्या कामातील अनेक त्रुटी तपासादरम्यान समोर आल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे. या प्रकरणात सात ते आठ अधिकाऱ्यांची भूमिका तपास पथकाला संशयास्पद वाटली आहे.
आर्यन खान प्रकरणात 65 जणांचे चार वेळा जबाब नोंदवले. कारण वेळोवेळी जबाब हे बदलले जात होते. तसेच या गुन्ह्यांचा तपास करताना इतर गुन्ह्यांतही तफावत आढळली. एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयात या सर्वाचा अहवाल हा पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात पैशांच्या देवाण घेवाणीबाबत पूर्ण तपास झाला नाही. कारण तक्रारदाराने जबाब फिरवला असून आर्यन खानला जाणून बुजून टार्गेट केल्याचे तपासात समोर आले आहे.
कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात ज्या सात ते आठ एनसीबीच्या अधिकाऱ्यांची भूमिका ही संशयास्पद होती. त्याच्यावर विभागीय कारवाईला सुरूवात झाली आहे. या अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका ही इतर एक दोन गुन्ह्यात ही आढळून आली आहे. जे NCB च्या बाहेर आहेत त्यांच्यावर कारवाईसाठी वरिष्ठांकडे परवानगी मागितली आहे. या प्रकरणात पुराव्या अभावी तपास झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.
आर्यन खानला भोगावा लागला तुरुंगवास
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर 3 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले होते. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं. त्यानंतर आर्यन खानसह सहा जणांना क्लीनचिट मिळाली.
संबंधित बातम्या