Aryan Khan Chronology : मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर 3 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले होते. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मोठा मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं. आता आर्यन खानसह सहा जणांना क्लीनचिट मिळाली आहे. 


आर्यन खानला अटक झाल्यापासून आतापर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम : 



  • 2 ऑक्टोबरच्या शनिवारी मुंबई क्रुझ टर्मिनलवरील कोर्डिलिया क्रुझवर धाड

  • 3 ऑक्टोबरला रविवारी आर्यनला अटक आणि सुटटीकालीन न्यायालयाकडून ४ ऑक्टोबरपर्यंत पहिली कोठडी

  • 4 ऑक्टोबरला पुढील तपासासाठी आर्यनला एनसीबी ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी

  • 7 ऑक्टोबरला मुख्य महानगरदंडाधिकारी न्यायालयाकडून आर्यनला न्यायालयीन कोठडी

  • आर्यन आर्थर रोड कारागृहात, कोरोनानियमावलीनुसार आठवड्याभरासाठी विलगीकरण कक्षात

  • न्यायालयीन कोठडी मिळताच आर्यनकडून जामिनाची याचिका

  • 8 ऑक्टोबरला जामीनावर सुनावणी झाली, मात्र एनसीबीकडून आक्षेप

  • मुख्य महानगदंडाधिकारी न्यायालयाने जामीन फेटाळला

  • 11 ऑक्टोबरला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयात जामीनासाठी अर्ज

  • एनसीबीने उत्तर देण्यासाठी मागितला आठवड्याचा अवधी, मात्र बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश

  • 12 ऑक्टोबर काहीही कारवाई नाही

  • 13 ऑक्टोबर जामीनावर सुनावणी, एनसीबीकडून तीव्र विरोध

  • एनडीपीएस कायद्यातील कलम 29 नुसार अश्या कटात सामील असणं हा एक गंभीर गुन्हा आहे. एएसजी अनिल सिंह यांची न्यायालयात माहिती

  • 14 ऑक्टोबरला जामीनावरील सुनावणी पूर्ण न्या. वी.वी. पाटील यांनी निकाल राखून ठेवला.

  • 15 ते 19 ऑक्टोबरपर्यंत सणासुदीच्यानित्ताने न्यायालय बंद.

  • आर्यनचा कारागृहातील मुक्काम वाढला

  • 20 ऑक्टोबरला न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.

  • 26 ऑक्टोबरला उच्च न्यायालयात सुनावणी सुरू.

  • 27 ऑक्टोबरला आर्यन, अरबाज, मुनमुनचा युक्तिवाद पूर्ण.

  • 28 ऑक्टोबरला न्यायमूर्ती सांबरे यांच्याकडून अखेर जामीन मंजूर.

  • 29 ऑक्टोबर दुपारी 3 वाजता हायकोर्टाकडनं निकालाची प्रत उपलब्ध

  • 4:30 च्या सुमारास जुही चावला हमीदार म्हणून कोर्टात हजर

  • 6:45 वाजता कोर्टाची प्रक्रिया पूर्ण, आर्यनची सीलबंद रीलिज ऑर्डर जारी

  • 30 ऑक्टोबर पहाटे 5:30 वाजता रिलिज ऑर्डर आर्थर रोडच्या जामीन पेटीतून काढली

  • 30 ऑक्टोबर : अखेर आर्यन खानची जामीनावर सुटका 

  • 5 नोव्हेंबर : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी जामिनावर सुटलेला आर्यन खान एनसीबीच्या कार्यालयात पोहोचला. जामीन देताना कोर्टानं घातलेल्या अटींनुसार आर्यनला एनसीबी कार्यालयात हजर व्हावं लागलं आहे.

  • 7 नोव्हेंबर : आर्यन खान आणि समीर खान यांना NCB च्या एसआयटीचे समन्स, चौकशीसाठी हजर राहण्याचा दिला आदेश

  • 27 मे : कॉर्डिलिया क्रझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानसह सहा जणांना  क्लीनचिट मिळाली आहे. सबळ पुराव्यांअभावी या सहा जणांना निर्दोष सोडण्यात आलं आहे. या प्रकरणी आता केवळ 14 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. एनसीबीचे

  • डीडीजी संजय सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे.

  • 27 मे :  क्रूझ ड्रग्ज केस प्रकरणी चुकीच्या पद्धतीने तपास केल्याबद्दल एनसीबीचे तत्कालीन मुंबई झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे. 


संबंधित बातम्या


Cruise Drugs Case : समीर वानखेंडेंच्या अडचणी वाढल्या, चुकीच्या पद्धतीने तपास केल्याबद्दल केंद्र सरकार करणार कडक कारवाई


Cruise Ship Drugs Case : ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसह सहा जणांना क्लिनचीट; 14 आरोपींविरोधात चार्जशीट दाखल