Nagpur RSS Latest Updates :  जैश ए मोहम्मदशी संबंधित असलेल्या तरुणाने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतींची रेकी केल्याच्या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपुरात रेकी करण्यासाठी आलेला तरुण 26 वर्षीय तरुण विमानाने जुलै महिन्यात नागपुरात आला होता. सीताबर्डी परिसरातील एका हॉटेलमध्ये दोन दिवस त्याचे वास्तव्य होते.


त्याच दरम्यान त्यांनी रेशीमबाग परिसरात संघाशी संबंधित डॉ हेडगेवार स्मृती मंदिर परिसराची रेकी केल्याची माहिती आहे. रेकी केल्यानंतर तो नागपुरातून परतला... दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये तो हॅण्डग्रेनेडसह अटक झाल्यानंतर या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला. सेंट्रल एजन्सीज ने त्याच्या कळून आरएसएस ची रेकी केल्याची माहिती नागपूर पोलिसांना दिली.


त्यानंतर नागपूर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जम्मू काश्मीर मध्ये जाऊन त्या तरुणाची चौकशी केल्याची ही माहिती आहे.  दरम्यान जैश ए मोहम्मदचा स्लीपर सेल म्हणून काम करणारा तो तरुण नागपुरात असताना त्याला स्थानिक पातळीवर कोणी मदत केली होती का याचा शोध ही आता नागपूर पोलीस घेत आहेत.


दरम्यान यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतींची जैश ए मोहम्मद कडून रेकी केली जाणे अतिशय गंभीर बाब आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. याची माहिती आता पोलिसांना आणि केंद्रीय यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे यासंदर्भात योग्य खबरदारी महाराष्ट्राचे पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा घेतील असा विश्वास आहे... याला अत्यंत गांभीर्याने घेतले पाहिजे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha