जळगाव : पक्षानं आदेश दिल्यास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार असल्याचे वक्तव्य भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलं आहे. जळगाव मनपा निवडणुकीनिमित्त शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी निवासस्थानी पत्रकारांशी चर्चा करताना हे वक्तव्य केले.
"सध्या गिरीश महाजन हे जिल्ह्याचे नेते आहेत. पण मी पक्षाचा कोणताही नेता नाही. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्त्वात मी काम करण्यास तयार आहे. पण हे करताना मी कोणत्याही वाईट प्रवृत्तींना साथ देणार नाही" असेही खडसे म्हणाले. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील विळ्याभोपळ्याचं वैर सर्वश्रुत आहे. तरी खडसेंच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
तसेच खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार डॉक्टर सतीश पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले. सतीश पाटलांनी आपल्या पक्षाचे नगरसेवक निवडून येतात का याकडे लक्ष द्यावे. तसेच आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत कदापिही जाणार नसल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले.
"जळगावात कोणतेही पाठबळ नसताना यापूर्वी आपण 33 नगरसेवक निवडून आणले आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्ष विजयी केला. त्यावेळी फक्त एकट्या नाथाभाऊने जळगावात पक्ष वाढविला. निवडणुका सुरु होऊ द्या. माझ्या हातात भरपूर काही आहे. आगे आगे देखो होता है क्या..." असे खडसे म्हणाले.
...तर गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात काम करेन : एकनाथ खडसे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jun 2018 11:20 AM (IST)
पक्षानं आदेश दिल्यास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार असल्याचे वक्तव्य भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -