राहुल आणि सोनिया गांधींना राजकारणातलं काय कळतं, दानवेंचं टिकास्त्र
एबीपी माझा वेब टीम | 15 Aug 2016 05:16 PM (IST)
वर्धा: ''पप्पू म्हणजे राहुल गांधी, ते पंतप्रधान मोदींवर टिका करतात, मनमोहन सिंह यांना कधीच लोकसभेत बोलले पहिल नाही, सोनिया गांधी तर चिट्ठी वाचून श्रद्धांजली अर्पण करतात, यांना राजकारणाचं काय कळतं,'' अशी टिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केली. ते स्वाध्याय मंदिर येथील जाहीर सभेत बोलात होते. सोनिया गांधींवर टीका करताना, पुस्तकात पाहून खिचडी शिजत नाही, तर देश कसा चालवायचा ? असा प्रश्नही दानवेंनी यावेळी उपस्थित केला. यावेळी भाजपला जातीयवादी पक्ष म्हणणाऱ्या सर्व राजकीय नेत्यांवरही टीका केली. ''शरद पवार, मायावती, लालूप्रसाद, यांनी कधीना कधी भारतीय जनता पक्षासोबत युती केली आहे. नितीशकुमार भाजपला जातीयवादी म्हणतात. पण जे जे भाजपला जातीवादी म्हणतात, ते भारतीय जनता पक्षाच्या पंगतीत तोंड खरखट करून गेले आहेत, त्यामुळे त्यांना भाजपला जातीयवादी म्हणण्याचा काहीच अधिकार नाही.''