Ravinder Waikar Mumbai News : गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये गरबा खेळताना धक्का लागल्यामुळं दोन गटात राडा झाल्याची घटना घडली आहे. यावेळी तीन जणांच्या टोळीकडून एका 19 वर्षीय विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. नेस्को सेंटरमध्ये दांडिया कार्यक्रमात दोन गटात राडा झाल्यामुळं शिवसेना खासदार रवींद्र वायकर नेस्को सेंटर विरोधात आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांना भेटून नेस्को सेंटरवर कारवाई करण्याची मागणी खासदार रवींद्र वायकर करणार आहेत. 

Continues below advertisement

गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये जे काही कार्यक्रम होतात त्याच्यामुळं आम पब्लिकला खूप मोठा त्रास

मुंबईत मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव आणि दांडिया कार्यक्रम सुरु आहे. खासदार रवींद्र वायकर यांच्या लोकसभा मतदारसंघात 260 ठिकाणी दांडिया गरबा सुरु आहे. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये जे काही कार्यक्रम होतात त्याच्यामुळं आम पब्लिकला खूप मोठा त्रास होतो असे वायकर म्हणाले. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये होत असलेल्या कार्यक्रमामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर आणि जोगेश्वरी विक्रोली लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी होते असेही वायकर म्हणाले. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये सुरू असलेल्या दांडिया गरबामध्ये गरबा खेळण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे. गर्दीमध्ये धक्का लागल्यामुळे मारामारी होत असेल तर धक्कादाय घटना आहे असे वायकर म्हणाले. गरबा खेळत असताना जर कोणी मारामारी करत असेल तर पोलीस प्रशासनाने लक्ष घालून तात्काळ कारवाई करत अटक केली पाहिजे अशी मागणी देखील वायकर यांनी केली. 

महत्वाच्या बातम्या:

Continues below advertisement

Sambhaji Bhide : दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा, संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, भारत निर्लज्ज लोकांचा...